बातम्या

शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे साताऱ्यात दोन राजांचं मनोमिलन

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन करण्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अखेर यश आले. सातारा लोकसभेसाठी उदयनराजेच उमेदवार राहतील. त्यासाठी सर्व आमदार व स्थानिक पदाधिकारी त्यांना मदत करतील, असा आदेशच पवार यांनी दिला आहे. त्यांच्या आदेशाला सर्वांनीच सहमती दर्शवली.

आज पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची खासदार व आमदारांसोबत बैठक घेतली. उदयनराजे यांच्या उमेदवारीला शिवेंद्रराजेसह इतर स्थानिक नेत्यांचा विरोध होता. मात्र, नेहमीप्रमाणे शरद पवार यांनी त्यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवले. 

मावळमधून पार्थ पवारच

मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शरद पवार यांनी पार्थ निवडणूक लढवणार नसल्याचे या अगोदर जाहीर केले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या सर्वच स्थानिक नेत्यांनी पार्थ पवार हेच सक्षम उमेदवार होवू शकतात असा आग्रह केला. त्यामुळे पार्थ हे मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीकडून उमेदवार राहतील, हे निश्चित झाले आहे.

Web Title: Udayanraje Bhosale is finally NCPs Loksabha Election Candidate from Satara

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic News: पुण्यातील वाहतुकीत ४ मे पासून मोठे बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई

Raigad News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला; आमदार पुत्रासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

SCROLL FOR NEXT